Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदा येथे नवयुवकांचे मनसेत बिग इनकमिंग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या पुढाकार अनेक नवयुवकांच्या पक्षप्रवेशाने येणाऱ्या काळात परिसरातील राजकीय समीकरण बदलन्याचे चित्र धनराजसिं...
मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या पुढाकार
अनेक नवयुवकांच्या पक्षप्रवेशाने येणाऱ्या काळात परिसरातील राजकीय समीकरण बदलन्याचे चित्र
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
        नुकतिच तालुक्यातील नांदा व बीबी येथे झालेली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, कोरपना तालुक्यातील आवाळपुर, नांदा यापरिसरामध्ये असलेले अनेक मोठे सिमेंट कंपन्याचे वास्तव्य, शिवाय स्थानिक युवकांची बेरोजगारी व शासनामध्ये सहभागी असलेल्या पक्ष्यांची व नेत्यांद्वारा स्थानिय बेरोजगार नवयुवाकांची होत असलेली उपेक्षा आणि उदासीनता या सर्व बाबींना समोर ठेवून विरूर, गाडेगाव, आवाळपूर, नांदा फाटा, बीबी या औद्योगिक परिसरातील शेकडो नवयुवक चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा सचिव प्रकाश बोरकर, मनसेचे कार्यकर्ते भास्कर लोहबळे, पुरुषोत्तमजी पुट्ठावार ,बंडू  गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे होमाजी उरकुडे, रामा चिंचोलकर, मनोहर उदापुरे, अविनाश श्रीराम, कैलास ताकसांडे, कपिल शिडाम, विठ्ठल कैलास गोरे, शुभम कोसरे, अविनाश काकडे, वैभव राजूरकर, कुणाल मुठ्ठलकर, अनिल निकाळे, संतोष कोरांगे, राजू कोडापे, राजकुमार बांदुरकर, हनुमान काकडे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षांमध्ये प्रवेश केल्याने परिसरातील राजकीय समीकरण येणाऱ्या काळात बदलल्याचे चित्र नक्कीच पहायला मिळेल. शिवाय याच परिसरात अल्ट्राटेक, मुरली ऍग्रो दालमिया, अंबुजा, माणिकगड अशा नवाजलेल्या मोठमोठ्या सिमेंट कंपन्या असताना रोजगाराच्या बाबतीमध्ये येथील स्थानिक युवकांना जाणून बुजून डावल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा याकरिता मोठे आंदोलन उभारले जाईल व स्थानिकांना योग्य तो न्याय दिला जाईल असे मत मनसे चे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी व्यक्त केले. नविन  प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतीक असलेले दुपट्टे प्रदान करून त्यांचे सन्मान करण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top