स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांची कारवाई
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपूर -
काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पोस्टे दुगापूर हद्दीतील ईमली बार व नायटा पेट्रोलपंप समोर जुन्या वैमन्यस्यातून 7 ते 8 इसमानी मृतक नामे महेश मेश्राम रा. दुर्गापूर यांचेवर पाळत ठेवून घेराव घालून धारदार घातक शास्त्रांनी वार करून ठार केले, मारेकरी येवढ्यावरही न थांबता त्याचे शिर निर्दयपणे धडावेगळे करून घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर फेकून पळून गेले. या गुन्हा संदर्भात दुर्गापूर पोलीस स्टेशनला अप क्र.189/2022 कलम 302,143,147,149,427 भा. द.वी. सह कलम 4.25 भारतिय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोउपनि अतुल कावळे यांचेसह अमलदाराची चार विशेषाधिपथके गठीत करण्यात आली. सदर पथकांनी अजात आरोपीतांचे नाव व त्यांचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला असता यातील संशयीत आटोपी इसम हे वर्धा जिल्हयात स्कॉपीओ गाडीने पळून जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून लागलीच सदर वाहनाचा माग काढून स्थानीक गुन्हा शाखेचे सपोनि कापडे व सपोनि भोयर यांचे पथकांनी पाठलाग करुन सदर स्कॉपीओला आरंभा टोल नाका जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले व योग्य ती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील संशयीत नामे अतुल मालाजी अल्लीवार वय 22 वर्ष रा.समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापूर, दिपक नरेद्र खोब्रागडे वय 18 वर्ष रा.समता नगर वार्ड क्र 6 दुर्गापूर, सिध्दार्थ आदेश बन्सोड वय 21 वर्ष रा. नेटी दुर्गापुर, संदेश सुटे चोखान्द्रे, वय 19 वर्षा सम्राट अशोक वार्ड क्र 2 दुर्गापूर, सुरज दिलीप शहारे वय 19 वर्ष रा.समता नगर वार्ड क्र6 दुर्गापूर, साहेबराव उत्तम मलिये वय 45 वर्ष रा नेटी समतानगर वार्ड क्र6 दुर्गापूर, अजय नानाजी दुपारे वय 24 वर्ष रा.ऊर्जानगर दुर्गापूर, प्रमोद रामलाल सुर्यवंशी वय 42 वर्ष रा. रराउजीनगर दुर्गापूर अशा एकूण आठ संशयीत आरोपीत इसमांना स्कॉपीओ वाहनासह गुन्हा घडल्यापासुन अवघ्या काही तासात ताब्यात घेतले.
सदर संशयीत आरोपीना स्थानिक गन्हे शाखेत आणत सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता यातील सहा आरोपी गुन्हयात प्रत्यक्ष सहभागी असून यातील दोन आरोपीनी आपल्या ताब्यातील चारचाकी स्कॉपीओ वाहन क्र.एम.एच. 04 जिझेड 9091 ने त्या सहा अरोपीतास पळुन जाण्यास मदत केली असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न होत असल्याने नमुद आरोपीताना पुढील तपाससाठी दुर्गापूर पोलीस स्टेशन दुगापूर यांचे ताब्यात देण्यात आले, पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती टीना जनवधू यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पोउपनि कावळे, पो.हवा. संजय आतंकलवार, धनराज कटकाडे, सुरेद्र महतो, नितीन साळवे, ना.पो.कॉ.सुभाष गोहोकार, संतोष येलपलवार, जमीर पठाण, मलिंद चव्हाण, गजानन नागरे, अजय बागेसर पो.कॉ. गोपाल आतकूलवार, नितीन टायपुटे रविंद्र पंधरे, गणेश भोयर, गणेश मोहले, मिलींद जांमुळे, प्रशांत नागोसे, गोपीनाथ नरोटे, महिला अमलदार अपन मानकर तसेच सायबर पोस्टे येथील पोहवा मुजावर अली यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.