Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलिने मिट्टी कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा - राकेश चिलकुलवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना शहर प्रामुख्याने GNR कंपनीला खडसावले आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा -         राजुरा तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ ह...
शिवसेना शहर प्रामुख्याने GNR कंपनीला खडसावले
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        राजुरा तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे, शासनाद्वारे बेरोजगार युवकांना आता कोणत्याही सरकारी नोकरीची व्यवस्था नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असून त्यात फक्त प्रकल्पग्रस्तांनाच नोकरी मिळत आहे, ती सुद्धा साहसासहसी नाही. प्रकल्पग्रस्तांनाही आपल्या शेत्या वेकोलिला देऊन वेकोलि मुख्यालयाच्या, भैय्या-भाऊ सारख्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहे. वाढत चाललेली बेरोजगारी व दिवसेंदिवस रसातळाला लागलेले धंदे यामुळे स्थानिक तरुण गुन्हेगारी कडे नाईलाजास्तव वाढत आहे. त्यामुळे राजुरा तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. 

        स्थानिक बेरोजगारांना वेकोलिने त्यांच्या अधिनस्थ कार्य करीत असलेल्या मिट्टी कंपनीत रोजगार देण्याची व्यवस्था करावी या करिता आज जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या सूचनेवरून राजुरा तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा याकरिता शिवसेना शहर प्रमुख राकेश भाऊ (बिल्लू) चिलकुलवार यांच्या नेतृत्वात GNR मिट्टी कंपनीच्या अधिका=यासोबत कंपनीत जाऊन चर्चा करण्यात आली. यावेळी राकेश चिलकुलवार यांनी स्थानिकांना डालवून परप्रांतीय कामगारांना कामावर घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ठणकावले. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूकर गौवर कोडापे, समीर शेख, अक्षय देवाळकर, विशाल ठाकूर, शुभम आत्राम, रवी आत्राम, शैलेश कुलते, शेखर पेडपालिवार, सानी रेडी व शिवसैनिक उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top