आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा (दिनांक 22/11/2022) -
राजुरा शहराजवळील चुनाळा टी पॉइंट येथे ठेकेदारी करतांना आपल्याला विश्वासात घेत नाही, असे म्हणून माजी नगरसेवक राजू डोहे (ex-corporator raju dohe) यांनी शब्बीर खान पठाण (shabbir khan pathan)यांना मारहाण केली. या प्रकरणी शब्बीर खान यांच्या तक्रारी वरून राजुरा पोलिसांनी माजी नगरसेवक राजू डोहे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (a case has been registered for assault)
दिनांक 20 नोव्हेंबर ला सकाळी दहा वाजता आपले काही सहव्यावसायिक यांचे सोबत शब्बीरखान दाऊदखान पठाण हे चुनाळा पॉइंट जवळ (chunala point) चर्चा करीत होते. यावेळी माजी नगरसेवक राजू डोहे येथे आले आणि आमच्याशी चर्चा न करता ठेकेदारी करता असे म्हणून वादावादी केली आणि शब्बीर खान यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या हातातील कड्याने शब्बीर खान यांच्या डोक्याला मार लागला. या घटनेची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी घटनेची दाखल घेऊन डोहे यांचे विरुद्ध भादंवी कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शब्बीर खान हे राजुरा तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष आहेत. (Rajura Taluka Congress Minority Cell Former President)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.