आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जिल्हा परिषद चंद्रपूर च्या 15 वा वित्त आयोगा अंतर्गत कोविड वर मात देण्यासाठी नागरिकांनी नियमित योगा व प्राणायाम करण्याची सवय करून घेणे गरजेचे असा माणस लक्षात घेऊन जिल्ह्यात 58 योगाशेड (yogashed) चे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यात राजुरा तालुक्यात तीन योगाशेड मंजूर करण्यात आले. त्यापैकी कढोली येथील योगाशेड चे काम पूर्ण होऊन दिनांक 22 नोव्ह ला उदघाटन व लोकार्पण सुनील उरकुडे माजी सभापती जिप चंद्रपूर (Sunil Urkude Former Speaker ZP Chandrapur) यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी अलीकडच्या काळात येणाऱ्या विविध रोगाच्या साथीवर मात करण्यासाठी परिसरातील जनतेने नियमित योगा करण्याची स्वय करून घेणे काळाची गरज आहे, त्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी तथा कर्मचाऱ्यांनी जाणजागृति करण्यास पुढाकार घ्यावा आणी केंद्रातून वारंवर अभ्यासू पंतप्रधान मोदीजींना या योगा प्रचार प्रसार अभियानात सहभागी व्हावे असे आव्हाहन सुनील उरकुडे यांनी उपस्थितांना केले. (kadholi)
सदर कार्यक्रमाप्रसंगी राकेश हिंगाने सरपंच काढोली अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काढोलीचे चे वैद्यकीय अधिकारी डॉ ओम सोनकुसरे, सुरेंद्र आवारी सरपंच चार्ली, पुरुषोत्तम लांडे उपसरपंच कोलगाव, सौ पडवेकर ताई उपसरपंच येथील, राहुल सपाट उपसरपंचधिडशी, शत्रुघ्न पेटकर माजी उपसरपंच मनोली, चौधरी सर योग गुरु दत्ता हिंगाने, किंगरे, उरकुडे ताई, मोरे ताई, हिंगाने ताई आदी ग्रामपंचायत सदस्य, खोब्रागडे ग्रामसेवक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील येथील समस्त अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोविड काळात रुग्णांना योगा शिकविणारे योग गुरु चौधरी सर यांचा सत्कार सभापतींनी केला व 10 मिनिट सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या योगा शिबिरा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.