Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: देवराव भोंगळे यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपनात ११४ तर बिबी येथे ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना -         कोरपना आणि बिबी येथे...
कोरपनात ११४ तर बिबी येथे ८८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
        कोरपना आणि बिबी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोरपना आणि बिबी येथे रक्तदान शिबिर (Blood donation camp) आयोजित करण्यात आले होते. कोरपना येथे राजीव गांधी चौक परिसरात आणि बीबी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोरपना येथे ११४ तर बिबी येथे ८८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. (Deorav Bhongale Birthday)

        याप्रसंगी  कोरपना korpana येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, सौ.अर्चनाताई भोंगळे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, सतीश उपलंचीवार शहर अध्यक्ष गडचांदुर, शिवाजी सेलोकर, किशोर बावणे, निलेश ताजने, आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, अमोल आसेकर माजी नगरसेवक, ओम पवार, अरुण मडावी, विजय रणदिवे, दिनेश खडसे, सुनील देरकर, शशिकांत आडकिने, हरिभाऊ घोरे, अभय डोहे, रामसेवक मोरे, जगदीश पिंपळकर, संदीप टोगे, नारायण कोल्हे, विजय पानघाटे, सत्यवान घोटेकर, नगरसेविका वर्षा लांडगे, सुभाष हरबडे, गीता डोहे, सविता तुमराम, पवन मोहितकर, प्रमोद पायघण, दिलीप पावडे, नदीम सय्यद, यशवंत इंगळे, पवन बूरेवार, दिनेश ढेगळे, प्रमोद कोडापे, पद्माकर धगडी, सागर धुर्वे सोशल मीडिया जिल्हासंयोजक आदी उपस्थित होते. 

        बिबी bibi येथे आयोजित रक्तदान कार्यक्रमात उद्घाटक म्हणून प्रसिद्ध समाजसेवी डॉ. गिरिधर काळे, प्रमुख पाहुणे तालुका  आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्निल टेंबे, पंचायत समिती सदस्य सविता काळे, नांदा येथील उपसरपंच श्री पुरुषोत्तम अस्वले,  बीबी ग्रा.पं. सदस्य दुर्गा पेंदोर, बिबी चे तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे, वासुदेव बेसूरवार, शंकर भाऊ आस्वले, सुनील भोयर, रामसेवक मोरे हरिभाऊ घोरे, बिबी चे पोलीस पाटील राहुल आसुटकर आदि उपस्थित होते. बिबी येथे एकूण 88 लोकांनी रक्तदान केला. 

        यावेळी देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी दाखवलेले प्रेम हे कधीच विसरू शकणार नाही व माझ्या वाढदिवसाला कोरपना येथे 114 तर बिबी येथे ८८ रक्त दात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्त दात्यांचे आभार मानतो असे मनोगत व्यक्त केले. कोरपणा येथे रक्तदान शिबिराला डॉक्टर हेडगेवार, रक्तपेढी नागपूर च्या डॉ. हर्षा सोनी व चमुनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमा ला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हि बातमी वाचली का....... 
माजी नगरसेवकाची ठेकेदाराला मारहाण
माजी नगरसेवक राजू डोहे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top