Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बिबट्याच्या हल्यात शेतकरी ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
BREAKING NEWS विरूर परिसरात पुन्हा वाघाची दहशत बिबट्याच्या हल्यात शेतकरी ठार शेतात रात्री मचाणीवर चढून शेतमालाची राखण करणे जीवावर भोवले राजु...
BREAKING NEWS
विरूर परिसरात पुन्हा वाघाची दहशत
बिबट्याच्या हल्यात शेतकरी ठार
शेतात रात्री मचाणीवर चढून शेतमालाची राखण करणे जीवावर भोवले
राजुरा तालुक्यातील तुंमागुडा (विरुर) येथील घटना   
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
        शेतात रात्री मचाणीवर चढून जागरण करत शेताची राखण करण्याकरिता गेलेल्या एका 55 वर्षीय इसमाला मचाणीवर चढून बिबट्याने हल्ला करून दोनशे मीटर अंतरावर नेऊन बळी घेतल्याची घटना आज सकाळी चार वाजताच्या सुमारास विरुर स्टेशन जवळील सुब्बाई तुम्मागुडा येथे घडली, सदर घटनेमुळे या परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

          मिळालेल्या माहितीनुसार विरुर स्टेशन पासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुरा तालुक्यातील सुब्बई तुम्मागुडा येथील शेतकरी भीमा प्रभू घुगोलत वय 55 हा नेहमी प्रमाणे आपल्या शेतात जंगली जनावरकडून होत असलेल्या पिकाची नासधूस रोखण्याकरिता शेतात गेला व शेतात सात फूट उंचीच्या मचाणीवर बसून आपल्या शेतीच्या पिकाचे रक्षण करीत होता मात्र दबा धरून असलेल्या बिबट्याने जगाल करीत असलेल्या शेतकऱ्याचा मचाणीवर चढून भीमाला दोनशे मीटर लांब नेऊन त्याचा जीव घेतला, लगतच्या शेतातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केली मात्र तोपर्यंत भीमाचा जीव गेला होता व बिबट्याने तिथून पलायन केले. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
          सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ विरुर वनपरिक्षत्राधिकारी पवार व त्याची टीम व विरुर पोलीस ठाणेदार राहुल चव्हाण व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आला. सदर घटनेमुळे परीसरातील जनतेत असंतोष पसरल्यामुळे काही काळ नागरिकांनी घटनेचा तीव्र विरोध दर्शविला. तेव्हा मृतक परिवाराला 25 हजार रोख रक्कम देऊन शासनाकडून मिळणार आर्थिक मदत लवकर देऊ मृतकाच्या मुलाला वनविभागात सेवेत रुज्जू करू असे आश्वासन देण्यात आले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top