Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अंगणवाडीत पोषण आहार व शैक्षणिक साहित्याचेवाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाळू फाउंडेशन चे संस्थापक अमित महाजनवार यांच्या कन्येचा वाढदिवसा प्रसंगी कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी...

बाळू फाउंडेशन चे संस्थापक अमित महाजनवार यांच्या कन्येचा वाढदिवसा प्रसंगी कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
पोंभुर्णा - 
        कुपोषण मुक्ती साठी जन चळवळ उभारणाऱ्या अग्रणी सामजिक संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांची कन्या कु. अंशुमती हिच्या वाढदिवसानिमित्त आज पोभूर्णा पंचायत समिती अंतर्गत सातारा तुकुम गावातील दोन कुपोषित बालकांना बाळू पोषण आहार देण्यात आला. तसेच अंगणवाडीतील बालकांना दप्तर, दोन व तीन लाईन्स नोटबुक, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पोषणासह बालकांचा शैक्षणिक विकाससुद्धा आवश्यक असल्याचे अमित महाजनवार यांनी या प्रसंगी मत प्रदर्शित केले. यावेळी सौ. अमृता महाजनवार, अजितबाबु, अक्षय सुर्तेकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांचे पालक उपस्थित होते. याच प्रकारे आपले वाढदिवस बाळू संकल्पनेतून कुपोषित बालकांना सकस आहाराचे वाटप करून साजरे केल्यास चंद्रपूर जिल्हा कुपोषण मुक्त होण्यास निश्चितच मदत होईल.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top