Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चार हजार किलो गोमांस सहित ट्रक जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन आरोपींना अटक - एक फरार धानोरा-आर्वी टी पॉईंट जवळ नाकाबंदी करत विरूर पोलिसांची कारवाई  अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा -   ...
दोन आरोपींना अटक - एक फरार
धानोरा-आर्वी टी पॉईंट जवळ नाकाबंदी करत विरूर पोलिसांची कारवाई 
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
        गोमांस विक्रीवर बंदी असताना देखील गोमांसची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई विरूर पोलिसांनी केली. ट्रकद्वारे गोमांस तस्करी करताना 4 लाख रुपये किमतीच्या गोमांस आणि 13 लाख रुपयांचा ट्रकसह 2 आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाला. 
        ट्रकद्वारे गोमांसची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन पोलिसांनी नाकाबंदी करीत धानोरा आवीं टर्निंग पाइंट जवळ सदरचा ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 4 हजार किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी गोमांस सह ट्रक ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीवरून 4 लाख किमतीचे गोमांस व 9 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल करत शाहरुख खान रफिक खान 24 वर्ष, मोहम्मद जुबेर मोहम्मद शरीफ वय 20 वर्ष राहणार इस्माईलपुरा कामठी यांना अटक केली तर मोहम्मद तहसीम राजा कुरेशी अब्दुल गफार कुरेशी राहणार कामठी हा फरार झाला. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात विरुरचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांचे नेतृत्वात हवालदार दिवाकर पवार, पोलीस नरेश शेंडे, संतोष आडे यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top