Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजप नेते माजी जिप सदस्य भीमराव पूसाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मंगी (बु) येथे आमदार सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी राजुरा -         राजुरा तालुक्यातील मौजा मंग...
मंगी (बु) येथे आमदार सुभाष धोटेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता बैठक
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        राजुरा तालुक्यातील मौजा मंगी (बु) येथे आज कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील पुसाम यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मंगी (बू) येथील बालचंद्र बुजाडे यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी चंदू बूजाडे, रामचंद्र बुटले, धनराज साळवे, संजय मेश्राम, सुमित आसुटकर, रवींद्र गोहने, दशरथ पुलगमकर, सिद्धार्थ चनकापुरे, जयपाल इंदोर, अविनाश सातपुते, जगु कुमरे, विजय मडावी, अजय आत्राम, अजय उईके, विजय गुगुल, नवनाथ जाधव, सुनील भोयर, रामदास पा बोरकुटे, प्रभाकर मडावी, शरद पुसम, रमेश भिवनकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले. 

        या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विजय क्रांती कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, माजी पंस सदस्य रामदास पूसाम, आत्मा समितीचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, बबन आत्राम, सुनील भोयर, सरपंच शंकर तोडासे, महादेव भसारकर, उपसरपंच संदीप घोटेकर, शुभाकांत शेरखी यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top