Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोंडपिपरी जवळ दोन दुचाकींची अमोरा-समोर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुभाष धोटेंनी कार थांबवून केली जखमींची मदत आरोग्य व पोलीस विभागाशी संपर्क साधून मदत पोहोचविल्याने अनर्थ टळला आमचा विदर्भ - कार्यालय प्रति...
आ. सुभाष धोटेंनी कार थांबवून केली जखमींची मदत
आरोग्य व पोलीस विभागाशी संपर्क साधून मदत पोहोचविल्याने अनर्थ टळला
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
गोंडपिपरी -
        चंद्रपूर-आलापल्ली महामार्गावार गोंडपिपरी जवळ दोन दुचाकीस्वारांनी आमोरा-समोर धडक झाली. यामध्ये दुचाकी चालक पवन राजु बामणे रा. कोठारी आणि श्रीकांत कृष्णकांत कृपाकर रा. आष्टी हे दोघे दुचाकी चालक अपघातात जखमी होऊन पडले होते. या दरम्यान आमदार सुभाष धोटे हे धाबा येथे रस्ते विकासकामाचे भूमिपूजन करून दुसऱ्या कार्यक्रमाला याच मार्गाने जात असताना त्यांना हे दोन्ही दुचाकीस्वार अपघातात क्षतिग्रस्त झालेले दिसले तेव्हा त्यांनी आपली कार थांबवून स्वतः या अपघाताची चौकशी केली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दोन्ही जखमींना गोंडपिपरी आरोग्य विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून तत्काळ मदत यंत्रणा बोलवून दोघांना दवाखान्यात भरती करण्यास सांगितले. गोंडपिपरी पोलिस निरीक्षकांना बोलावून या दोन्ही जखमींना तातडीने मदत पोहचविली. आमदार सुभाष धोटे यांच्या या संवेदनशील आणि माणूसकीच्या व्यवहाराने या दोन्ही अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार पोहोचली व मोठा अनर्थ टळला. तर आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथील कार्यकर्त्यांना सांगून या दोन्ही अपघातग्रस्तांकडे लक्ष देऊन आवश्यक मदत कार्य पोहोचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top