बल्लारपूर (दिनांक 22/11/2022) -
चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री संघ व ज्येष्ठ झेड आर यू सी सी सदस्य श्रीनिवास सुंचुवार (zrucc membar shrinivas sunchuwar) यांच्या नेतृत्वाखाली बल्हारशाह रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. ज्यामध्ये सर्व काम कासवच्या गतीने सुरू असल्याचे दिसून आले. त्यात 2019 मध्ये सुरू झालेल्या पिटलाईनचे काम एका वर्षात पूर्ण करायचे होते मात्र तीन वर्षे उलटूनही पिट लाईनचे काम अपूर्ण आहे. तसेच प्लॅटफॉर्म कव्हर शेड, फूट ओव्हर ब्रिज, लिफ्टचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. (ballarshah railway station)
सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अन्यथा ही कामे पूर्ण करण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ झेड आर यू सी सी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिला. या वेळी विकास राजूरकर, गणेश सैदाणे, ज्ञानेंद्र आर्य, विनोद काबरा, प्रशांत भोरे, रामेश्वर पासवान सह चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री संघचे सदस्य उपस्थित होते.
माजी नगरसेवकाची ठेकेदाराला मारहाण
माजी नगरसेवक राजू डोहे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
माजी नगरसेवकाची ठेकेदाराला मारहाण
माजी नगरसेवक राजू डोहे यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.