तहसीलदारांना दिले निवेदन
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा - (दि. २३/११/२०२२)
महाराष्ट्र राज्यातील वसई येथील रहिवासी असलेल्या श्रध्दा वालकर या तरूणीची दिल्लीत झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटबंना हे सर्वस्व माणुसकीला काळीमा फासनारे आहे.या प्रकरणातील उच्चस्तरीय चौकशी करून नराधमास फाशीची व्हावी या करिता भाजपा महिला आघाडी राजुरा तर्फे आक्रमक होऊन निर्देशने करण्यात आले व तहसीलदार हरीश गाडे राजुरा यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. (shradha murder case) (BJP mahila aaghadi) (Rajura)
पोलिसांना पाच महिन्यानंतर गुन्ह्याचा छडा लागला व दोषीला पकळण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. क्रूरकर्मी प्रकारे निघृन हत्या करणाऱ्या आरोपीस कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहीजे जेने करूण पुढे अशी घटना होवु नये. या खटल्याची केस फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी व लवकरात लवकर दोषी ला फासावर चढविण्यात यावे तसेच लव जिहाद (Love Jihad) विरोधात शासनाने कठोर कायदा तयार करावा ज्यामुळे तरूण मुलींना आमिष दाखवुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही अशीही मागणी भाजपा महिला आघाडी कडून करण्यात आली. fast track court
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा स्वाती देशपांडे, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा माणिक उपलंचिवार, माजी नगरसेविका प्रिती रेकलवार, शुभांगी रागीट, स्वरूपा झंवर, शितल वाटेवर, अनुष्का रैच, सिमा देशकर, नम्रता खोंड, शांता कदम, मीरा कुलकर्णी, विश्वहिंदु परिषद जिल्हा संयोजिका सिमा देशमुख, प्रतिभा भावे, निला देशमुख आदी भाजपा महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. (Vishv Hindu Parishad)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.