Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: येरगव्हान येथील माजी सरपंच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड. संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात येरगव्हान येथील माजी सरपंच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश भाजपा नेते वामन तुराण...
माजी आमदार अँड. संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात
येरगव्हान येथील माजी सरपंच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
भाजपा नेते वामन तुराणकर व श्रीमती शशिकला ताई डोहे यांचा पुढाकार
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहे, आदिवासी बहुल क्षेत्रातील अनेक नागरिक भाजपा पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश घेत आहे, तसेच पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा नेते वामन तुराणकर व श्रीमती शशिकलाताई डोहे यांच्या पुढाकाराने तसेच माजी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपा आदिवासी आघाडी नेते वाघुजी गेडाम, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, श्रीनिवास मंथनवार यांच्या उपस्थितीत राजुरा तालुक्यातील येरगव्हान येथील माजी सरपंच वर्षा सिडाम, बालाजी दुर्गे, नामदेव शेडमाके, देवानंद शेडमाके, सौ अरुणा जगताप, सौ सुनीता रामटेके, सौ राजश्री आईलवार ,सौ बेबीताई जमबोड, शैलेश बावणे, सुभाष रामटेके, शाहरुख शेख, अमीर शेख, पांडुरंग सिडाम, अनुप करमरकर, शिवराम रामटेके, गौतम झाडे, संदीप झाडे, संदीप रामटेके, अनिल दुर्गे, रंजित येमुलवार, दुर्गा आईलवार, दशरथ मडावी, मनोज सिडाम, लक्ष्मण आत्राम, मेघराज भगवे, मारोती झाडे, सौ वर्षा पाटील, संजय दुर्गे, नागोराव सलामे, शंकर मेश्राम, रंजित पेंटापर्टीवार, सौ रंजना मुन, प्रशांत दुर्गे, सौ भमलाबाई बावणे, दयाबाई करमरकर, जगण कुळसंगे, सौ शीला भोंदे, सौ शांताबाई आईलवार, सौ गोपिका मडावी, सौ मंगला आत्राम, अविनाश ननेगर्तीवार, बबन येमुलवार, व्याकटी आईलवार, सौ तृप्ती येमुलवार, सौ सौदर्या तनगर्तीवार, सौ विक्ता मेश्राम, नंदिनी येमुलवार यांच्यासह अनेक बहुसंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थित भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, सर्व कार्यकर्त्यांचे भाजप पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले व सर्वाना एकहाती सत्ता काबीज करण्याकरिता ताकतीने लढण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, अनिल खनके, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, अजय राठोड, अरुण लोहबळे, प्रवीण जगताप, पांडुरंग सिडाम उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top