Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन नेते गौतम रत्ने यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन नेते गौतम लिंगाजी रत्ने यांनी दिना...
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन नेते गौतम लिंगाजी रत्ने यांनी दिनांक ३० सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी शाल, श्रीफळ आणि काँग्रेस चा दुपट्टा देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत केले. सोबतच संजय दिगदिकुलवार यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केले. त्यांचेही स्वागत करण्यात आले. गौतम रत्ने हे अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीशी जुळलेले आणि बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे. 
या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, भेदोडा येथील नथुजी कोंडावार, सुरेश ठाकरे, विकास पिंपळकर, संगीता टेकाम, कृष्णा आत्राम, प्रतिमा कुळसंगे, कविता आत्राम, अक्षय कोंडावार, विनायक कांबळे, प्रफुल आत्राम यासह अनेकांची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top