Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील उच्च शिक्...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील उच्च शिक्षण, संशोधन आणि विशेष अभ्यास केंद्र द्वारा "संशोधन पद्धती " या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून डॉ आशिष लिंगे, सहयोगी प्राध्यापक, सि.पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, अध्यक्ष म्हणून श्री दौलतराव भोंगळे, माजी प्राचार्य तथा सहसचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ राजेश खेराणी तथा संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ राजेंद्र सदाशिव मुद्दमवार, आय क्यू ए सी समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी उपस्थित होते. ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. कार्यशाळेला उपस्थित संशोधकांना संबोधित करताना डॉ आशिष लिंगे म्हणाले की, अनेक विद्यापीठात पिएच. डी.चे संशोधन कार्य करीत असताना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. बरेचदा संशोधक विद्यार्थ्याना कार्य कुठून, कसे आणी काय करायचे इतकेच नव्हे तर एकंदरीत संशोधन कार्य सुरू करताना विविध समस्या निर्माण होत असतात म्हणून यासाठी योग्य  अशा मार्गदर्शनाची गरज आहे.संशोधन कार्य करीत असताना तळटीप, संदर्भ ग्रंथ, विविध वेब साईट, फोटो , मुलाखत, निरीक्षणे, अशा अनेक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे तसेच संशोधन पेपर कसा तयार करायचा याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना डॉ मुद्दमवार यांनी संशोधन कार्य करीत असताना अशा प्रकारच्या कार्यशाळा का महत्त्वाची आहे हे संशोधक विद्यार्थ्याना पटऊन दिले. तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी वारकड सर म्हणाले की, आचार्य पदवीचे शिक्षण घेत असताना आणि संशोधन कार्य करीत असताना अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून संशोधक विद्यार्थ्याना कार्य करणे सोयीचे होणार आहे, अशाप्रकारचे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम दुपारी ३:३० वाजता पार पडला. यावेळी समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. शि. प्र. मं. राजुरा चे सचिव अविनाश जाधव उपस्थित होते, प्रमुख अतिथी श्री साजिद बियाबानी कोषाध्यक्ष आ. शि. प्र. मंडळ राजुरा,श्री देवराव भोंगळे, माजी आध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, प्राचार्य डॉ संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ राजेश खेरानी, डॉ आशिष लिंगे, समन्वयक डॉ राजेंद्र मुद्दमवार आईक्यूएसी चे समन्वयक डॉ मल्लेश रेड्डी, प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेला ठाणे, नाशिक, मुंबई, नागपूर, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक संशोधक विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ राजेंद्र सदाशिव मुद्दमवार यांनी केले तर संचालन प्रोफेसर डॉ संजय लाटेलवार यांनी केले आणि या कार्यशाळेचे आभार डॉ संतोष देठे यांनी मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ मुद्दमवार, डॉ संजय शेंडे, डॉ संजय लाटेलवार, डॉ संतोष देठे, डॉ चेतना भोगाडे, डॉ वनिता वंजारी, प्रा. मनीष पोतनुरवार, प्रोफेसर डॉ विशाल दुधे, डॉ प्रमोद वसाके, प्रा. विठ्ठल आत्राम,प्रा. तूम्मावार, तुकाराम कोडापे, सूरज कन्नाके, सूरज पचारे, अमन निमगडे, साक्षी राऊत, निकिता जोगी तथा महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी अथक परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top