Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर नप च्या "त्या" सभापतींना मिळाल्या खुर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांच्या प्रयत्नाना मिळाले अखेर यश धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी गडचांदूर - शहराला सन २०१४ ...
विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांच्या प्रयत्नाना मिळाले अखेर यश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
गडचांदूर -
शहराला सन २०१४ मध्ये नगर परीषदचा दर्जा प्राप्त झाला. मोठी निधि प्राप्त व्हायला सुरुवात झाली व बऱ्यापैकी विकास कामे हळूहळू होऊ लागली. त्या दरम्यान दूसरी सार्वत्रिक निवडनुक २०२० ला पार पडली आणि त्या निवडनुकित गडचांदुर नगरवासियानी मोठ्या अपेक्षा ठेवुन कांग्रेसच्या सौ. सविताताई टेकाम गडचांदुर न. प. च्या पहिल्या नगराध्यक्ष बनल्या. शहरातील विकास करतील मोठी अतिरिक्त निधी आणतील, जनतेच्या समस्या तातडीने सोडवतील अशी अपेक्षा येथील नगरवासियांना होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या, आपणच निवड केलेल्या सभापतींना सध्या आठ महिन्या पासून हक्काच्या खुर्च्या, टेबल मिळवून देता आले नाही ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सभापती महोदयाकडे विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यास वारंवार गरज भासत होती. परंतु त्या सभापतींना हक्काची खुर्ची नसल्याने ते न. प. कार्यालयात बसत नाही हे लक्षात आल्याने त्यांनी मुख्याधिकारी यांचे कडे सन्माननीय सभापती महोदया करीता स्वतंत्र खुर्ची, टेबलची मागणी केली असता मुख्याधिकारी यानी तात्काळ मागनीची दखल घेत न. प. कार्यालयात त्यांना स्वतंत्र खुर्ची, टेबल, नेमप्लेट सह व्यवस्था करून दिली. आता न.प. चे सर्व सभापति महोदय कार्यालयात बसून जनतेच्या समस्या सोडवतील अशी अपेक्षा गडचांदुर चे नगरवासी करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top