Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अबब.... हे काय..?? अंदाजपत्रकाताच लाखोंची वाढ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरोधी पक्ष नगरसेवक डोहे यांचा आरोप  सरकारी संपत्तीची लूट करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा वि...
विरोधी पक्ष नगरसेवक डोहे यांचा आरोप 
सरकारी संपत्तीची लूट करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर नगर परिषद मध्ये सुरू असलेल्या अनेक विकास कामात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून केल्या जात आहे. कधी ग्रीन जिम मधील भ्रष्ट्राचार तर कधी ओपन स्पेस सौंदर्यीकरण, रोड, नालीच्या कामाची गुणवत्ता हलक्या दर्जाचे असल्याचे आरोप लागले होते. आता नुकतीच सुरु असलेला घनकचरा व्यवस्थापन कामातील भ्रष्ट्राचार होत असल्याची चर्चा सुरू असताना आता चक्क घनकचरा व्यवस्थापनच्या अंदाजपत्रक तयार करतांनाच ४,५१,१९०/- रुपये जास्तीची रक्कम टाकून अंदाजपत्रक तयार केले असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

घनकचरा व्यवस्थापन कामाच्या अंदाजपत्रकात नमूद असलेल्या पेक्षा कमी घंटागाडी तसेच कमी मनुष्यबळ लावून नाममात्र बिल कपात करून मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याचे आरोप काही दिवसापासून होत आहे. त्या कामाचे अंदाजपत्रक विरोधी नगरसेवक डोहे यांनी माहिती अधिकार अंतर्गत मागणी केली असता त्यात ४,५१,१९० रू चक्क जास्तीचे लावून अंदाजपत्रक तयार केले त्यामुळे नगर परिषद ची वार्षिक ४,५१,१९०/- रू नगर परिषदची आर्थिक नुकसान केली आणि ठेकेदार यांना लाभ पोहचविले असल्याने आज मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. सदर कामाची चौकशी करून दोषिविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक डोहे यांनी यापूर्वी सुध्दा एका नाली कामाच्या अंदाजपत्रकात चुकी असल्याचे नगर परीषादला लक्ष्यात आणून दिले व नगर परिषदची होणारी आर्थिक टाळले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी डोहे यांना नगर परिषदेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले होते. परंतु परत दुसऱ्यांदा नगर परिषदेच्या अंदाजपत्रकातील चूक लक्ष्यात आणून दिली त्यात काही तथ्य आहे का? व तथ्य असल्यास नप अधिकारी पुन्हा त्यांचे अभिनंदन मानतील का? वारंवार चुका करुण सरकारी संपत्तीची लूट करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करतील की त्यांना मोकळे रान मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top