Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रापं नांदा येथील प्रभाग ४च्या मतदारांनी केली मतदान केंद्र बदलण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१०० चे वर मतदारांनी स्वाक्षरी करुन दिले निवेदन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - ग्रामपंचायत नांदा येथे सार्वत्रिक नि...
१०० चे वर मतदारांनी स्वाक्षरी करुन दिले निवेदन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
ग्रामपंचायत नांदा येथे सार्वत्रिक निवडणुक घेण्यात येत आहे. किंतु नांदा येथील प्रभाग ४ चे मतदान केंद्र नांदा गावात ठेवण्यात आले आहे. प्रभाग ४ मधील सर्व मतदार नांदाफाटा येथे राहतात. त्यामुळे  येथील मतदारांना नांदा गावात  जाऊन मतदान करणे गैरसोयीचे होते, करीता त्याचे मतदान केंद्र जि. प. शाळा नांदा ऐवजी बदलवून नांदा फाटा येथील सांस्कृतिक भवन, शिवाजी शाळा अथवा तेलगु  शाळा येथे मतदान केंद्र देण्यार यावे अशी मागणी प्रभाग ४ मधील १०० चे वर मतदारांनी स्वाक्षरी करुन  निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कोरपना यांच्याकडे  केली आहे. तरी निवळणुक अधिकाऱ्यांनी येथील मतदारांची होणारी गैरसोय बघता यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी प्रभाग ४ येथील मतदारांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top