धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
गेल्या सात वर्षापासून कोरपना शहरात माकडांनी उचांध मांडला असून यामुळे नगरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन वनशेत्र सहाय्यक कोरपना यांना सामाजिक कार्यकर्ते अतुल आसेकर व नादिर कादरी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरपना हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथील सतरा ही प्रभागात माकडांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांकडून नागरिकांवर हल्ले चढवले जात असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. हे माकड लहान मुले, वृद्ध मंडळी यावर टार्गेट करून हल्ले चढवत आहे. तसेच बाहेर वाळू घातलेले खाद्यपदार्थ, अन्नधान्य, कपडे यांची नासधुस करीत असल्याने महिला वर्ग पुरत्या कंटाळल्या आहे. वनविभागाला यापूर्वी बंदोबस्त करण्याविषयी निवेदन देण्यात आले. मात्र एक दोन माकड पकडुन ही मोहीम थांबवण्यात आली.
त्यामुळे पूर्णपणे उपद्रवी माकडांचा त्वरित बंदोबस्त होणे आवश्यक आहे. निवेदन देतेवेळी आनंद पानघाटे, डॉ. असीम रॉय, देवराव कारेकर, सत्यवान घोटेकर, मुजीब कादरी, प्रमोद घोटेकर, इंदिरा चामाटे, शोभा कारेकर, सुनिता भोयर, सीमा धारणकर, विद्या हंसकर, पुष्पा हंसकर, ज्योती हंसकर, पिंकी घाटे, रहिसा कादरी, झाडे, मनीषा किनेकर, सुनिता परसुटकर, सीमा आमणे, अमरीन कादरी, भावना चामाटे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.