Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपण्याची भैरवी झाली फिजिओथेरपिस्ट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना- महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक द्वारा बी.पी.टी.एच. (बॅचलर ऑफ फिजिओथे...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना-
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक द्वारा बी.पी.टी.एच. (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कोरपना येथील भैरवी विनोद मालेकर हीने फिजिओथेरपिस्ट ची पदवी प्राप्त केली आहे.
ती पिंपरी चिंचवड पुणे येथील चैतन्य मेडिकल फाउंडेशन कॉलेज ची विद्यार्थीनी होती. इंटरशिप नंतर ती आपली रुग्णसेवा देणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील ,कॉलेजचे प्राध्यापक यांना दिले आहे. ती कोरपना येथील प्रतिष्ठित कापड व्यावसायिक विनोद मालेकर यांची कनिष्ठ कन्या आहे. तिचे माजी प्राचार्य संजय ठावरी, माजी नगरसेवक सुभाष तुराणकर यांनी व गावातील नागरिकांनी अभिनंदन करत शुभेच्या चा वर्षाव केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top