Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलि प्रशासन देत आहे 812 प्रकल्पग्रस्तांना नौकरीच्या थापा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोठ्या नेत्यांच्या बैठकीही फक्त फोटो सेशन पुरत्या नौकरीची वाट पाहत वृद्ध होत आहेत प्रकल्पग्रस्त धोपटाळा टू सास्ती ओसी खाण प्रकल्प  हरीश शिंद...
मोठ्या नेत्यांच्या बैठकीही फक्त फोटो सेशन पुरत्या
नौकरीची वाट पाहत वृद्ध होत आहेत प्रकल्पग्रस्त
धोपटाळा टू सास्ती ओसी खाण प्रकल्प 
हरीश शिंदे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
        वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येत असलेल्या धोपटाळा टू सास्ती ओसी कोळसा खाणी करिता 812 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहे. या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. पण मागील एक वर्षांपासून वेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्तांना नौकरी देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उफाळन आला असून आता तातडीने नौकरी देण्याची प्रक्रिया वेकोलि प्रशासनाने सुरू करावी, अन्यथा वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. सास्ती परिसरात धोपटाळा टू सास्ती ओसी या नव्या कोळसा खाणीचे काम सुरू आहे. याकरिता माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार जमिनीच्या तुकडाबंदी मुळे प्रकल्पग्रस्तांच्या नौकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. या संदर्भात वेकोलि प्रशासन न्यायालयात गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नौकरी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने काही शेतकऱ्यांनी शेतात माती टाकण्यास विरोध केला आहे. वेकोलिच्या या अन्यायपूर्ण कारभारामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक होत आहे. नौकरीचा प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा मुख्य प्रबंधक कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. 

        या खाणीकरिता कोलगाव, सास्ती, मानोली, भडांगपूर शिवारातील 812 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहे. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, नौकरी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळत आहे. मुळात 2100 एकर जमिनीच्या बदल्यात 1080 नौकरी अपेक्षितआहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील एक वर्षांपासून वेकोली प्रशासन शेतकऱ्यांना नौकरी देण्याचे गाजर दाखवत आहे.

नुसते गाजर दाखवत आहे
        या खाणीकरिता कोलगाव, सास्ती, मानोली, भडांगपूर शिवारातील 812 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहे. या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, नौकरी देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळत आहे. मुळात 2100 एकर जमिनीच्या बदल्यात 1080 नौकरी अपेक्षितआहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील एक वर्षांपासून वेकोली प्रशासन शेतकऱ्यांना नौकरी देण्याचे गाजर दाखवत आहे.

मोठ्या नेत्यांच्या बैठकीही फक्त फोटो सेशन पुरत्या
        या प्रकल्पातील काही लोकांनी आप आप-आपल्या परीने जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या दरबारी हजेरीही लावली. वोट बँक करिता मोठ्या नेत्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन फोटोसेशनही करून घेतले मात्र शेकडो बैठकी आणि निव्वळ आश्वासनाव्यतिरिक्त प्रकल्पग्रस्तांच्या पदरी काहीही पडलेले नसून हे तथाकथित मोठे नेते आणि त्यांचे चमचे कार्यकर्ते यांच्यापासूनही आता प्रकल्पग्रस्तांना सावध राहणार लागणार आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Top