Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ACC कंपनीतील HR विरुद्ध गुन्हा दाखल करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांची मागणी  डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -         सफेद झंडा कामगार...
सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांची मागणी 
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
        सफेद झंडा कामगार संघटनेचा माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन घुग्घुस येथे ACC चांदा सीमेंट कंपनी नकोडा जिल्हा चंद्रपूर या कंपनीवर सक्त कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी केली.

        सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की ज्यावेळेस 27 जानेवारी 2022 रोजी आठवडी बाजार नकोडा येथे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यावेळेस ACC चांदा सीमेंट कंपनी HR यांनी दि. 13 जानेवारी 2022 रोजी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली होती, त्या बैठकीत सुरेश मल्हारी पाईकराव सोबत अशोक भगत, अशोक आसमपल्लिवार, दत्ता वाघमारे, शरद पाईकराव उपस्थित होते.

        बैठक संपल्यानंतर HR यांनी पाईकराव यांना म्हटले की 'पाच दो मिनिटे आपसे अकेले में बात करनी है' असे म्हणत कार पार्किंग जवळ घेऊन गेले आणि हे सर्व सोडा काय हवे सांगा असे म्हणत ऑफर केली, पाईकराव यांनी PF भरा आणि ज्या मागण्या करण्यात आल्येल्या आहेत त्या मंजूर करा अशी मागणी केली. मात्र कंपनीने चार कामगारांना विनाकारण कामावरून काढून टाकले. त्या चार कामगारांचा कोणताही कसूर नसतांना त्यांच्यावर आठ महिन्यांपासून अत्याचार होत आहे कामगारांवरती व त्यांच्या परिवाराला मानसिक व शारीरिक त्रास या ACC कंपनी मुळे सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून ACC कंपनीवरती सक्त कारवाई करुन यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना यांनी केली. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top