Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निधन वार्ता - श्रीमती कुसुमदेवी शर्मा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपले – सुधीर मुनगंटीवार आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी बल्लारपूर -      ...
श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपले – सुधीर मुनगंटीवार
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर -
        भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व बल्लारपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या आईचे आज दुपारी ४ वाजता निधन झाले.
अंत्ययात्रा उद्या सकाळी 11:00 वाजता डॉ. कल्लूरवार हॉस्पिटल, गणपती वॉर्ड जवळील त्यांच्या निवासस्थानापासून निघेल.

श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपले – सुधीर मुनगंटीवार
        बल्‍लारपूरचे माजी नगराध्‍यक्ष श्री. हरीश शर्मा यांच्‍या मातोश्री श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने भाजपा परिवारातील ज्‍येष्‍ठ सदस्‍य व मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपल्‍याची शोक भावना चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

        श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांनी पती श्री. जगदीशचंद्र शर्मा आणि मुलगा श्री. हरीश शर्मा यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बल्‍लारपूर शहरात भाजपाचे संघटनकार्य मजबुत करण्‍यावर कायम भर दिला. अतिशय शांत व मायाळु स्‍वभावाच्‍या श्रीमती कुसुमदेवी यांनी भाजपा महिला आघाडीच्‍या कामात सुध्‍दा सक्रीय योगदान दिले. त्‍यांच्‍या निधनाने भाजपा परिवाराची मोठी हानी झाली आहे. या दुःखातुन सावण्‍याचे बळ परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटूंबियांना देवो व त्‍यांच्‍या आत्‍म्‍याला शांती प्रदान करो, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top