आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
बल्लारपूर -
येथील गोल पुलिया नजीकच्या वर्धा नदीच्या गणपती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भंगाराचे दुकान आहे. या दुकानातील भंगार अनेकदा रस्त्यावर टाकून असते, तसेच या ठिकाणी मोठमोठे ट्रक उभे केले जाते. यामुळे येथील दुचाकी वाहक व चारचाकी वाहकांनाही याठिकाणी उभे राहणारे ट्रक जाण्याची वाट पाहून थांबावे लागते. प्रसंगी दुसरी वाट शोधावी लागते. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. या भागातच सार्वजनिक शौचालय आहे. पूर्वी शौचालयाच्या परिसरात घाण राहायची. परंतु घरोघरी शौचालय या योजनेंतर्गत बहुसंख्यक लोकांच्या घरी शौचालय बांधले गेले. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारे लोक कमी झाले. त्यातल्या त्यात स्वच्छ सुंदर-भारत अंतर्गत या शौचालय परिसरात स्वच्छता असते. ही बाब अभिनंदनीय असली, तरी या भंगारामुळे हा परिसर परत अस्वच्छ दिसत आहे. बल्लारपूर नगर परिषदने मागील काही वर्षांपूर्वी गणपती घाट जवळील भागात नवीन बांधकाम, लहान मलांकरिता खेळण्यासाठी पाळणे, घसरपट्टी आणि मोठ्यांकरिता रोजच्या व्यायामाचे स्थायी स्वरूपातील उपकरणे लावून त्या भागात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. मात्र, या ठिकाणी भंगार तुडवित जावे लागते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.