Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कारमध्ये इसमाचा पक्षाघाताने मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क  नागभीड -         नागभीड - चंद्रपूर महामार्गावरून स्वतःच्या कारने प्रवास करीत असताना सावरगाव - चिखलगावच्यामध्ये ...
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
नागभीड -
        नागभीड - चंद्रपूर महामार्गावरून स्वतःच्या कारने प्रवास करीत असताना सावरगाव - चिखलगावच्यामध्ये इसमाचा चारचाकी वाहनातच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून रात्री तळोधी पोलिसांनी पेट्रोलियम करीत असताना त्यांच्या निदर्शनात आली. मृतकाचे नाव लंकेश देविदास कावरे (28)असून तो गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वडधा गावचा रहिवासी आहे. सविस्तर वत्त याप्रमाणे आहे की. मृतक हा ब्रह्मपुरी येथून चंद्रपूरकडे जात असताना सावरगाव -चिखलगावच्या मध्ये वांढरू देवस्थान जवळ चारचाकी वाहन (एम.एच.34 बी एफ 3509) रस्त्याच्या कडेला रात्री थांबून होते. दरम्यान तळोधी पोलिसांकडून पेट्रोलियम सुरू असताना सदर गाडी उभी दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तत्काळ सदर इसमास नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत इसमाच्या मोबाइलवरून कॉल करून या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. डॉक्टरांनी पक्षघाताने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनंतर सिद्ध केले. तसेच मृतकाला मिरगी रोगाचा त्रास असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले दरम्यान तळोधी पोलिसांनी मर्ग क्र.8/22 कलम 174 अंतर्गत मृत्युंची नोंद केली आहे. त्याच्या मागे वडील, भाऊ असा परिवार आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top