Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क गोंडपिपरी -         जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला करून ठार केल्य...
वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी -
        जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना 12 ऑक्टोबरला सकाळ 9 वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यात घडली. गोंडपिपरी तालुकाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दरुर येथील किसन बाघू वराते (75) यांच्यावर वैयक्तिक जुन्या वादावरून मोरेश्वर गिरमा भोयर (45) यांनी धारदार चाकूने हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू यांनी सहकऱ्यांसह घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. तर मृतक किसन वराते यांना उपचारासाठी गोंडपिपरीवरून चंद्रपूर येथील रुग्णालयात नेताना वाटेतच कोठारीजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हाजर करणार असून पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top