Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पोलिसांची दिवाळी बोनसविनाच!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -         राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासा...
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
        राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहे. तरीही पोलिस कर्मचारी सुख सुविधांपासून वंचितच दिसून येत असला तरीही त्या पोलिस कर्मचाऱ्यांना अन्य राज्य कर्मचाऱ्यासारखा दिवाळी बोनस जाहीर केला नाही. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

        मागील कोव्हिड काळात चांगली कामगिरी केली राज्यसरकारने कोरोना योद्धा म्हणून गौरविले. मात्र तोच कोरोना योद्धा दिवाळी बोनसपासून वंचित ठेवले जात असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक पोलिसही शहीद झाले आहे. त्यांच्या कुटुंबाची फार मोठी हानी झाली आहे. तरीही त्यांना सुविधाअभावी दूर दिसून येत आहेत. तर पोलिसांना संघटना नसल्यामुळे त्यांचा आवाज ही उठवला जात नाही. यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातून मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे दिवाळी बोनस पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात मागणी सुद्धा केली आहे. परंतु अद्याप राज्य सरकारने पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस संदर्भात काही निर्णय घेतला नाही.

सुरक्षेसाठी 24 तास सज्ज
        'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' ब्रीदवाक्य उराशी बाळगून आपल्या संरक्षणासाठी सदैव तपर असतात, ज्याप्रकारे सीमेवर देशाचे संरक्षण करणारे सैनिक महत्त्वाचे असतात, त्याचप्रकारे राज्यातील आंतरिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस महत्त्वाचे असतात. आपला प्रत्येक सण-उत्सव आपण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. कारण आपल्या सुरक्षिततेसाठी पोलिस 24 तास सज्ज असतात. चोविस तास ऑनड्युटीच असल्याने पोलिसांना तारेवरची मोठी कसरत करावी लागते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top