गडचांदूर -
कोरपना तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. प्रदेश निवडणूक अधिकारी राजू पल्लम यांनी एका आदेशानुसार सदर नियुक्ती केली आहे, उत्तम पेचे यांच्या पत्नी सौ. कल्पना पेचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. उत्तम पेचे यांनी अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल आमदार सुभाष धोटे, खासदार बाळू धानोरकर व काँग्रेस पक्षाचे आभार मानले आहे. काँग्रेस पक्ष शहरी व ग्रामीण भागात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पेचे यांनी सांगितले आहेत. उत्तम पेचे यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.