आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील दुर्गाडी, पारडी, रूपापेठ, परसोडा, कोठोडा, पिपर्डा, गावांना भेटी देऊन कार्यकर्ता बैठका घेतल्या. परिसरातील कार्यकर्ते, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रदेश काँग्रेसचे निवडणूक अधिकारी पल्लम राजु यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोरपना तालुका काँग्रेसचे नवनिर्माचित तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला तसेच यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर कोठोडा येथील नवनिर्वाचित सरपंच रमेश मेश्राम, ग्रा. प. सदस्य प्रकाश जीवने, विनोद मरसकोल्हे, साईनाथ हेमलता उमाटे, रंजना कुंदे, सुरेखा मेश्राम, रूपापेठ येथील नवनिर्वाचित सरपंच अवंतिका आत्राम, ग्राम पं. सदस्य विलास आडे, रवींद्र जुनघरे, विनोद तोडासे, अश्विनी कुमरे, कविता कोडापे, परसोडा येथील नवनिर्वाचित सरपंच सौ गिरजा कोहचाटे, ग्रा. प. सदस्य सौ ज्योती तलांडे, सुमित्रा कुंठावार, सतिश गोलावार, पद्मा सिडाम, सौ सुरेखा दुर्लावार, गणेश मडावी, सतिश काटकर, सौ रविना मडावी, पिपर्डा येथील नवनिर्वाचीत सरपंच इंदिरा कुळमेथ, संजय जाधव, गोविंदा कुळमेथ, सुभद्रा लोडे, मंगला येडमे, लक्ष्मीबाई मेश्राम आदींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश मालेकर, उपसभापती संभाजी कोवे, गणेश गोडे, अनिल गोडे, सगिद रफिक शेख, संजय जाधव, प्रकाश मेश्राम, इस्तरीवार मारुती गोगलवार शालिक दूरलावार जयवंत देवलगडे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.