Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे पुरस्कार जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन गौरव व अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान  प्रसिद्ध समाजसे...
जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन गौरव व
अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान 
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे पुरस्कार जाहीर 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
        तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हेमलकसा येथील जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ. मंदाकिनी आामटे व डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना व सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेमार्फत अपंग कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या अर्चना मानलवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

        बिबी येथील ख्यातिप्राप्त समाजसेवक डॉ. गिरीधर काळे हे शरीरातील लचकलेल्या, तुटलेल्या अस्थिरुग्णावर मागील ३५ बर्षापासुन निशुल्क उपचार करित आहे. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी स्व. सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते अँड. वामनराव चटप आणि प्राचार्य डॉ. अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येते. रोख दहा हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाचा दिव्यग्राम महोत्सव ७ नोवेंबर ला बिबी येथील जिप शाळेत आयोजित केला असून मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, अँड. दीपक चटप, गणपत तुम्हाणे, संदीप पिंगे, विठ्ठल अहिरकर, हबीब शेख, सतीश पाचभाई, स्वप्निल झुरमुरे आदींनी कळविले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top