Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पणन महामंडळ व कृषी उत्पन्न बाजार समीती सोयाबिज तारण योजनेला गडचांदूर येथे सुरूवात धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना -         ...
पणन महामंडळ व कृषी उत्पन्न बाजार समीती सोयाबिज तारण योजनेला गडचांदूर येथे सुरूवात
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
        कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. येथे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. विक्रीच्या शुभारंभ दिनी ४७३० रुपये भावाने खरेदी करण्यात आले व पहिल्या दिवशीच भरपूर आवक आली. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचांदूर चे सचिव कवडू देरकर यांनी प्रथम बोली लिलावाद्वारे माल विक्री केलेल्या प्रथम शेतकरी बापूराव गोरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व शिवमांगल्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी ही सोयाबीन खरेदी ला सुरूवात केली. बाजार समितीने अडत व दलाली मुक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनची खरेदीची सुरूवात केली आहे. 

        शेतकऱ्यांना कोणतेही अडत नसल्याने RTGS द्वारे धान्य विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा कारण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांने स्वत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर माल तुलाई होत असल्याने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याची लुट केल्या जात नसल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले. या प्रसंगी सय्यद आबिद अली, गणेश वाभिटकर, शंकर ठावरी, अझहर शेख, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोरे, राठोड व सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे CEO अंगद गुट्टे व इतर शेतकरी उपस्थीत होते. सचिव देरकर यांनी व्यापाऱ्याचे घरी थेट माल विक्री न करता बजार समीतीच्या यार्डवरच विक्री करण्याची विनंती केली आहे. अडत पद्धती बंद असल्याने शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये व या लिलावात भाग घेऊन ज्यादा भावाचा लाभ घ्यावा घेण्याचे आव्हाण शेतकऱ्यांना केला आहे. कोरपना व गडचांदूर यार्डवर बाजार समीती काटयाची व्यवस्था केल्याने व व्यापाऱ्याच्या काटयावर शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे. तसेच पणन महामंडळ व कृषी उत्पन्न बाजार समीती सोयाबिज तारण योजना गडचांदूर येथे सुरू केली आहे. तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्याना केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top