Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वच्छतेला जीवनाचा मूलमंत्र बनवा - डॉ एस.एम. वारकड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा ...
श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व नेहरू युवा केंद्रच्या संयुक्त विद्यमाने 
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील रासेयो तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "स्वच्छ काल-अमृत काल" ही संकल्पना समोर ठेवून फिट इंडिया फ्रीडम रन ३.० व स्वच्छ भारत २०२२ या स्वच्छता अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात येऊन महाविद्यालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ वारकड यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत असतांना प्लॅस्टिक कचऱ्याचे दूरगामी परिणाम पटवून दिले आणि या प्रदूषणापासून मुक्ततेसाठी युवकांनी स्वच्छता हा जीवनाचा मूलमंत्र बनवायला हवा असे आवाहन केले. 
यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी रासेयो स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत जनमानसात जागरूकता करावी जेणेकरून स्वच्छ भारत ही संकल्पना पूर्णत्वास जाईल असे सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार अँड. संजय धोटे, आ.शि.प्र.म. चे सचिव अविनाश जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, उपप्राचार्य डॉ.आर.आर. खेरानी, आयक्यूएसी चे समन्वयक डॉ. मल्लेश रेड्डी, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की व अन्य प्राध्यापकवृंद आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top