Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिप शाळा लखमापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळ...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान जय किसान चे प्रणेते भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बंडू बुच्चे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले कि, थोरांचे विचार अंगीकारून आपणही भविष्यामध्ये त्यांच्यापासून काही ना काही प्रमाणात तरी आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे कार्य करावे, समाज हितासाठी शाळेतून निघावे असे मार्गदर्शन केले. शाळेतील सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत यांनी गांधी जयंती तथा लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून कठीण परिस्थितीमध्ये माणसाने कसं सावराव त्यातून आपला मार्ग कसा काढावा, जीवनामध्ये अहिंसेतून खूप मोठे काम होऊ शकते, प्रेमाने जग जिंकता येते असे सांगत विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची आठवण करून दिली. जीवनात ध्येय ठेवून कार्य करत राहावे असे मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी लखमापूर शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यपाल पिंपळशेंडे, प्रभारी मुख्याध्यापिका कु. उरकुडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक बंडू बुच्चे, सहाय्यक शिक्षक करतारसिंग अलावत, अंगणवाडी सेविका ठावरी, पिंपळशेंडे, आवारी तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. संचालन सातवीत शिकणारी विद्यार्थिनी कु. योगिता भारत ढाकणे हिने तर आभार यश महेंद्र चौधरी या विद्यार्थ्याने केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top