रोडवरील यमराजरूपी खड्डे बुजिण्याची मागणी
बघा व्हिडीओ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर
नांदाफाटा-आवारपुर-सांगोडा रोड अनेक ठिकाणी जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहे. आवारपुर ग्राम पंचायत तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही रोडवरील खड्डे अजून पर्यंत बुजवण्यात आले नाही, उलट खड्डे सतत वाढत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रोजचे होणारे अपघात बघता आज संतप्त गावकऱ्यांनी आज सकाळी ८ वाजेदरम्यान रोडवरील वाहतूक पूर्ण करणे बंद केली.
आवारपुर येथील गावात मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी यमराजरूपी मोठे मोठे खड्डे पडले आहे. या ठिकाणी अनेक वाहन चालक पडले व जखमी झालेत. आज सकाळी शाळेत जाताना दोन विद्यार्थी आवारपुर गावाजवळील रस्त्यावर झालेल्या लांबलचक खड्ड्यामुळे आपल्या दुचाकीवरून खाली पडले. या घटनेने संतप्त नागरिकांनी आवरपुर रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे बुजवत नाही, तोपर्यंत रस्ता सुरू करणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने नांदा फाटा आवारपुर मार्गे चंद्रपूर वाहतूक पूर्णपणे बंद होऊन पाच ते सहा किलोमीटर पर्यंत मोठा जाम लागला आहे, त्यामुळे परिसरातील अनेक कंपनीचे वाहन अडकले आहे. यावेळी आवारपुर येथील उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सुरेश दिवे, कल्पतरू कन्नाके सदस्य, सुरेश जिवणे, लटारी ताजणे, गजानन डाखरे, नितीन शेंडे, भाविक उमरे, प्रदीप सुर, प्रदीप मडावी, उसेन मुरके, रवी ताजणे, प्रकाश उमरे, मंगेश सोयाम, महेश कोंडेकर, अक्षय माणूसमारे, निलेश जमदाडे सोबतच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
सोमवारी आवरपुर येथील खड्डे भुजवायचे आदीच ठरले होते. आवारपुर जवळील मोठे खड्डे आजच बुजवण्यात येईल.- बाजारे, उप विभागीय अभियंता, सा.बां. विभाग
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.