Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - दिनांक 02 ऑक्टोबर ला राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा...
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
दिनांक 02 ऑक्टोबर ला राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष विठ्ठलराव मारोतराव थिपे होते. सचिव मनोहर बुऱ्हाण, प्रा. विजय आकनूरवार, प्रा. अशोक  डोईफोडे, ग्रंथपाल नागेश्वर रोहने उपस्थित होते.
गडचांदूर शहरात 1992 पासून हे वाचनालय सुरू आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षाचे पुस्तक उपलब्ध आहे विद्यार्थी वाचनालयाचा विना मूल्य लाभ घ्यावा. वाचनालयात एकूण 7500 पुस्तक आहे आणि 35 मासिके, 12 वृत्तपत्र रोज येतात. वाचनालयाची प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे असे ग्रंथपाल नागेश्वर रोहने यांनी सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top