Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दिव्यांग मुलीवर अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क घुग्घूस - घुग्घूस शहरात दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारला उघडकीस असून पोलिसांनी आरोपीस...
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
घुग्घूस -
घुग्घूस शहरात दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारला उघडकीस असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
येथील एकेवीस वर्षीय दिव्यांग मुलीवर त्याच वॉर्डात राहणाऱ्या मुलाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. विकास चटकी असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार विकास चटकी हा 1 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता दरम्यान एका दिव्यांग मुलीच्या घरी गेला आणि तिच्या सोबत गैरवर्तन करू लागला याविषयीची तक्रार त्या दिव्यांग मुलीने पोलीस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी विकास चटकी यांच्यावर कलम 354,(अ)452 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top