Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपण्यात पहिल्यांदाच जनतेतून निवडला जाणार सरपंच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या होत आहे निवडणुका धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना -         कोरपना तालुक्यातील 25 ग्राम...
कोरपना तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या होत आहे निवडणुका
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
        कोरपना तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका, थेट जनतेतून सरपंच निवडल्या जाणार. कोरपना तालुक्यात पहिल्यांदाच सरपंच हा जनतेतून निवडल्या जाणार असल्याने मतदारांमध्ये चांगली उत्सुकता वाढली आहे. पहिल्यांदाच अशी निवडणूक होत आहे. मतदार आपले गणित मांडताना दिसतात. कोणाचे गणित खरे ठरतात. येत्या 17 तारखेला ठरणार सध्या कोरपणा तालुक्यात जिकडे तिकडे निवडणुकीचीच हवा दिसत आहे.

        आजी माझी आमदाराची ह्या निवडणुकीचे चांगली कसोटी लागणार आहे दावे प्रतीदावे दोन्ही गट करत आहे. कोण बाजी मारेल कोणीच सांगू शकत नाही. कूठ दुहेरी लढत कुठं तिहेरी लढत असा सामना रंगत आहे. कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे पडधम वाजले असून त्यामुळे 5 वर्ष शांत बसलेल्या पुढाऱ्यांना आपला मोर्चा आपला मोर्चा नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणाकडे वळविला असल्याचे दिसून येत असले तरी जनताही मागील 5 वर्षाचा हिशोब विचारत आहे. त्यामुळे अनेक पुढाऱ्यांची गोचीसुद्धा होताना दिसत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top