Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धानोली तांडा व चनई बु. येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गावातील विकासासाठी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार - अँड संजय धोटे धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना -         तालुक्यातील अन...
गावातील विकासासाठी सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार - अँड संजय धोटे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
        तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी ने एकहाती सत्ता काबीज केली असून अनेक सरपंच व सदस्य निवडून आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धानोली तांडा व चनई बु. ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी समर्पित उमेदवार विजयी झाले असून त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.

        माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून धानोली तांडा व चनई बु. येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून व त्यांच्या उपस्थिती सत्कार करण्यात आला. माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी शाल व पुष्पहार देवुन सर्व सत्कारमूर्तीचा सत्कार केला व यावेळी बोलताना म्हणाले की, गावातील विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत असून कोणतेही काम असल्यास पूर्ण सहकार्य करण्यात येईल असा विश्वास दिला. यावेळी भाजपा नेते निलेश ताजने, भाजपा आदिवासी नेते व माजी सरपंच अरुण मडावी, भाजपा शहर अध्यक्ष अनिल कवरासे, माजी सरपंच विजय रणदिवे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ओम पवार, वामन खाडे संतोष माणूसमारे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top