जिल्हाभरातील सर्व अंशतः आणि विनाअनुदानित शिक्षकांना मुंबई गाठण्याचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या राज्यातील साठ हजाराच्यावर शिक्षकांना शासनाने विविध अध्यादेश काढीत शिक्षकांना तसेच शाळांना सत्तेत आलेल्या प्रत्येक्ष पक्षाने फक्त लॉलीपॉपच दाखविले. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अखेर मागील पंधरा दिवसापासून हजारो शिक्षक शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे शंभर टक्के पगार सेवा, संरक्षण, निवृत्ती वेतन, वैद्यकीय ध्येयपूर्ती व समान काम समान वेतन या विविध मागण्यांना घेऊन शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या बॅनरखाली मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसले आहे.
दिवाळी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा व फार मोठा सण आहे. प्रत्येकजण हा सण आपल्या परिवारासोबत साजरा करण्याच्या प्रयत्नांमध्ये असतो, मात्र राज्यातील हजारो शिक्षकांच्या हातात पैसाच नसल्यामुळे आपल्या न्याय्य मागण्या करिता शिक्षकांनी आपली दिवाळी आझाद मैदानावर काळी दिवाळी म्हणून चटणी-भाकर खाऊन साजरी केल्याचे चित्र दिसून आले आहे. आंदोलनात शिक्षक-शिक्षिका आपल्या लहान मुलां-बाळा तर काही परिवारासोबत आले आहेत. असे असूनही शिक्षण विभागाला अजूनही जग आलेली दिसत नसून आता आंदोलनरात शिक्षकांची भाऊबीजही आझाद मैदानावर साजरी होत आहे. जो पर्यंत आंदोलनरात शिक्षकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आजाद मैदान सोडणार नाही असा ठाम निर्धार जिल्हातील शिक्षकांनी घेतला आहे.
जे शिक्षक आपल्या परिवारासोबत घरी बसलेले आहे अश्या शिक्षकांनी तात्काळ मुंबई गाठावी व आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा शिक्षक समन्वय संघाने केले असून मैदानावरती आपली उपस्थिती हीच यशाची होऊ शकते अन्यथा इतर राज्यातील शिक्षका प्रमाणे आपल्याला सुद्धा ठेकेदारी पद्धतीने पगार घेतल्याशिवाय शासन ठेवणार नाही, त्यामुळे आपल्या भविष्याची जाण ठेवत सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित, त्रुटी पात्र अघोषित शिक्षकांना मुंबई गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.