आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
गुरुवार दि. २७ ऑक्टॉबर २०२२ ला पोलीस स्टॉफ सह आर्म ॲक्ट कामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, एक डोक्याला पगडी बांधलेला इसम न्यु ईरा इंग्लिश हायस्कुल चे बाजुला कमरोला बनावटी देशी कट्टा बाळगुन फिरत आहे. या माहितीवरून सदर ठिकाणी सापळा रचून घेराव करून सदर इसमास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता. आरोपी कडून एक गावटी बनावटी देशी कटट्टा व चार जिवंत काडतुस असा १२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी आरोपी लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल वय १९ वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड, राजुरा याचा विरुद्ध कलम ३,२५ अप. क्र. ४३४/२०२२ हत्यार कायदा सहकलम १३५ मु.पो.का अन्वये कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे नेतृत्वात ठाणेदार संतोष दरेकर यांचे मार्गदर्शनात पथकातील सफौ, खुशाल टेकाम पो.हवा. रविंद्र नक्कनवार,पो.हवा. किशोर तुमराम,पो.शि. महेश बोलगोडवार, पोशि, संदिप बुरडकर, पोशि. तिरूपती जाधव यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.