Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला अमलनाला वेस्ट वेअर परिसर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला अमलनाला वेस्ट वेअर परिसर महात्मा गांधी विद्यालयातील हरित सेने विद्यार्थ्यांच्या उपक्रम धनराजसिंह शेखावत - आमचा व...
विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला अमलनाला वेस्ट वेअर परिसर
महात्मा गांधी विद्यालयातील हरित सेने विद्यार्थ्यांच्या उपक्रम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यालयातील हरित सेना युनिटच्या माध्यमातून गडचांदूर पासून जवळच असलेल्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या अमल नाला धरणाचे वेस्टवेअर बघायला आजूबाजूच्या परिसरातून अनेक पर्यटन निसर्गाचा व धबधब्याचा आनंद घेण्याकरिता येतात परंतु या आनंदाच्या भरात ते इथे कचरा करून पर्यावरणाचा तसेच निसर्गाचा समतोल बिघडवतात. या परिसरात अनेक पाण्याच्या बॉटल, खाण्याचे प्लास्टिक, खाद्यपदार्थाचे प्लेट्स अशा अनेक प्रकारचा कचरा करून जातात. नुकतेच पार पडलेले गणपती विसर्जन निमित्त अनेकांनी निर्माल्य कचरा टाकला होता. हरित सेनेच्या माध्यमातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे यांच्या मार्गदर्शनात व पर्यवेक्षक एच.बी. मस्की  तसेच हरीत सेनेचे प्रमुख प्रशांत धाबेकर, सतीश ठाकरे, सचिन नगराळे, अमोल शेळके व शाळेतील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव ठेवून व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन करण्याकरिता हा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. या स्तुत्य उपक्रमा चे कौतुक होत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top