Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक  कोरपना तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क चंद्रपूर - कोरपना तालुक्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक 
कोरपना तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
कोरपना तालुक्यातील व चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांची तातडीने पूर्तता करून न्याय मिळावा, यासाठी आज १६ सप्टेंबरला कोरपना तालुका शेतकरी संघटना, महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. चालू वर्षातील पावसामुळे ढगफुटी, अतिवृष्टी आणि नद्या व नाल्याच्या महापूरामुळे शेतक-याच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जमीनी रखडून गेल्या आहेत. वन्य प्राण्यांचा प्रचंड उपद्रव वाढलेला आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आधीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत रास्तभाव मिळत नसल्यामुळे शेतीत बचत नसल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला असून आधीच कर्जापायी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे आता तातडीने शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी कोरपना बस स्थानकापासून तहसील कार्यालयावर निघालेल्या भव्य मोर्चाने धडक देऊन तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हा प्रमुख अरुण पाटील नवले, महिला जिल्हाप्रमुख सौ.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, रमाकांत मालेकर, नीळकंठ कोरांगे, अविनाश मुसळे, शब्बीर जागीरदार, सविता काळे, बंडू पाटील राजूरकर, प्रवीण सावकार गुंडावार, अनंत गोडे, देविदास वारे, श्रीनिवास मुसळे, खुशाल सोयाम, भास्कर मत्ते, विलास धांडे, सुदाम राठोड, संजय येरमे, डॉ.नि.बा.मोहितकर, रवी गोखरे, संध्या सोयाम, गणपत काळे,मदन पाटील सातपुते, सय्यद इस्माईल, सत्यवान आत्राम, प्रभाकर लोडे, पांडुरंग वासेकर यांचेसह अनेक पदाधिकारी यांनी केले.
ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून तात्काळ न्याय मिळविण्याचे हेतूने मोर्च्याद्वारे निवेदन देऊन अनेक मागण्या करण्यात आल्या. कोरपना तालुका व चंद्रपूर जिल्हा शासनाने तात्काळ ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, पुरबाधीत व अतिवृष्टी बाधीत शेतक-याचे सर्व पिक कर्ज व शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यात यावे, विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ केंद्र सरकारने निर्माण करावे, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ वाटप सुरु करावे, राज्य शासनाने नियमीत कार्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानाची रक्कम तात्काळ वितरीत करावी, वनहक्क कायद्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण नियमीत करून पट्टे देताना असलेली तीन पिढ्याची अट रद्द करून तात्काळ पट्टे देण्यात यावे, शेतमालावर केंद्रसरकारने लादलेला जीएसटी तात्काळ मागे घेण्यात यावा, विजेची दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, कोरपना तालुक्यातील विरूर येथील शिल्लक राहिलेली १७ % जमीन व राजुरा तालुक्यातील सास्ती गावातील शिल्लक १६% जमिनीचे वेकोलीनी तात्काळ अधिग्रहण करावी, वन्य जीव सुरक्षा कायद्यात साप हा वन्यजीव असून पकडल्यास वा मारल्यास २ वर्षाची शिक्षेची तरतूद असल्यामुळे साप चावून मरणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबास इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, वन्य प्राण्यांचे शेतीतील पिकातील उपद्रव वाढले असून सतत उभे पिक शेताशेतात घुसून नष्ट केले जात आहे, त्यामुळे वण्याप्राण्याचा बंदोबस्त करण्याकरिता शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणाचे याथाशिघ्र वाटप करण्यात यावे, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय तत्काळ मंजुरी प्रदान करून सुरु करण्यात यावे, गडचांदुर - आदिलाबाद रेल्वे मार्ग तात्काळ मंजूर करावा या मागण्यांचा निवेदन देण्यात आले. मोर्चात कोरपना तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top