Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मराठवाडा मुक्ती दिवस भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा - हंसराज अहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मराठवाडा मुक्ती दिवस भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा - हंसराज अहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य ‘सेवा पंधरवडा’’ आशा वर्कर, आ...
मराठवाडा मुक्ती दिवस भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा - हंसराज अहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य ‘सेवा पंधरवडा’’
आशा वर्कर, आरोग्य सेविका, सफाई कामगार, जेष्ठ नागरिकांचा सत्कार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
मराठवाडा मुक्ती दिवस हा आनंद व उत्साहाचा प्रसंग आहे. मराठवाड्यापासून ते तेलंगाना पर्यंत हा संग्राम दिन सर्वत्र साजरा होतो आहे. आजच्या दिवशी निजामशाहीचा अंत होवून मराठवाडा स्वतंत्र झाला होता. यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. हा दिवस सदैव स्मरणात ठेवून या लढ्यातून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी असे आवाहन करतांनाच देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी यांचा जन्मदिन साजरा होत आहे हा दुग्धशर्करा योग असल्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
जिवती येथील हनुमान मंदिर परीसरात व कोरपना येथील शिवाजी चैकात दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिवस ध्वजारोहण करुन साजरा करतांना अहीर यांनी या लढयातील शौर्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून मोदीजींचा वाढदिवस उपस्थित कार्यकर्ते व नागरीकांच्या साक्षीने साजरा केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून  विद्यार्थ्यांना  नोटबुक चे वाटप केले. तसेच कोरोना काळात रुग्णसेवेत योगदान देणाऱ्या  आशा वर्कर्स, पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, शिक्षक, ज्येष्ठ नागरीक, सफाई कामगार व सेवाभावी कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करीत ‘सेवा पंधरवडास’’ सुरुवात केली. यावेळी निट परीक्षेत उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी आपल्या मनोगतात ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश सक्षम होत असून जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. मोदीजींनी गोरगरीबांच्या उत्थानासाठी अनेक योजना सुरु केल्या. स्वातंत्रानंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी सन्माननिधी सुरु केला. सर्वच घटकांना मोफत घरे दिली, उज्वला गॅस सह शेकडो योजना राबविल्या शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. गरीबांना विज कनेक्शन , प्रत्येक घरी नळ जोडणी, कोरोना काळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणे हीच खरी लोकसेवा आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हे शक्य झाले आहे. संविधानाचा सन्मान करणारा प्रधानमंत्री म्हणून मोदीजींची ख्याती आहे. देशात समानता हवी, प्रत्येक कुटुंबातील मुलांना शिक्षण हवे, सर्वांना स्वास्थ्यसुविधा व अल्पदरात औषधोपचार मिळावा जनऔषधीचे जाळे देशभरात पसरविले आहे. शेतकÚयांच्या शेतमालाला पुरेसा भाव दिला, कापसाला 10 हजाराहून अधिक भाव दिला, युरीयाच्या किमती स्थिर ठेवल्या अशा लोकाभिमुख नेतृत्वाचा वाढदिवस तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ज्यांच्या कार्याचा सन्मान झाला त्यांनी कर्तव्यभावनेतून लोकसेवेला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. यावेळी शिवापूर, दुर्गाडी, वनसडी येथील युवकांनी हंसराज अहीर व देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.   
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदारद्वय संजय धोटै, सुदर्शन निमकर, केशव गिरमाजी, नारायण हिवरकर, सुरेश केंद्रे, नामदेव डाहुले, गोदावरी केंद्रे, महेश देवकते, सतिष उपलंचीवार, अरुण म्हस्की, रामसेवक मोरे, निलेश ताजणे, विशाल गज्जलवार, अरुण मडावी, पुरुषोत्तम भोंगळे, रमेश मालेकर, प्रा. संजय ठावरी, जयाताई धारनकर, गिताताई डोहे, सुभाष हरबडे, वर्षा लांडगे, सौ झाडे, अल्काताई रणदिवे, इंदिराताई कोल्हे, गोपिनाथ चव्हाण, गोविंद टोकरे, राजेश राठोड, माधव निवले, बालाजी भुते, तुकाराम पवार, बालाजी माने, माधव पांचाळ, मोहन पांचाळ, अंकुश येमले, माधव कुळसंगे, विजय गोतावळे यांचेसह इतरांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top