Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न शिवसैनिकांची कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण चंद्रपूरमधील सोमय्या कॉलेजमधील घ...
कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
शिवसैनिकांची कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण
चंद्रपूरमधील सोमय्या कॉलेजमधील घटना
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडला आहे. बारावीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी नीट परीक्षेची तयारी करीत होती. प्रकरण दडपणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेनेने आक्रमकता दाखवून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या सोमय्या कॉलेजच्या इमारतीवरून विद्यार्थिनीने उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारी सोमय्या कॉलेज व पॉलिटेक्निक येथील बारावीत शिकणारी विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करत होती. तिने महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.
जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने या विद्यार्थिनीला नागपूर उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर संबंधित प्रकाराची माहिती शिवसैनिकांना देखील मिळताच शिवसैनिक सोमय्या कॉलेजमध्ये दाखल झाले. या संपूर्ण घटनेला कॉलेजच्या प्राचार्यांना जबाबदार ठरवून आणि कॉलेज हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी मारहाण केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top