राजुरा -
ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील सास्ती व राजुरा पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागासह स्थानिक देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेत सर्रास मिळत आहे. या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.भर चौकात दारुची होते विक्रीअवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासीयांतर्फे विचारला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.