Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: साखरवाही येथील युवकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा साखरवाही येथील राहुल आनंदराव पडवेकर, दामोदर माधव परसुटकर, अमर धनराज वनकार, प...
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा साखरवाही येथील राहुल आनंदराव पडवेकर, दामोदर माधव परसुटकर, अमर धनराज वनकार, प्रकाश तातोबा आगलावे यासह अनेक युवकांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला आणि अभिनंदन केले. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी होणारे विकास कार्य लक्षात घेता अनेक तरुण काँग्रेस पक्षात येत असून येणाऱ्या काळात अनेक युवक पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्साही आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top