आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरूवात झाली असून सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आहे. या पावन पर्वानिमित्य राजुराचे आराध्य दैवत माता भवानी मातेच्या चरणी लीन होऊन परिसरातील भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करीत असतात. आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राजुराचे आराध्य दैवत माता भवानी देवीचे दर्शन घेऊन आरती व पुजाविधीत सहभाग घेतला. क्षेत्रातील जनतेच्या सुखासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे, सौ. संध्या धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अरुण भोयर, सौ.लता भोयर, किरण शिवणकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.