युवकांचे मार्गदर्शन व संवाद साधून कार्यकर्त्यांचा उत्साहवर्धन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना सीमेवर असलेल्या कोरपना तालुका येथे मेहबूब शेख महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष च्या उपस्थितीत शरद युवा संवाद कार्यक्रमांतर्गत 206 वा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मेहबूब शेख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ने बेरोजगारीचा प्रश्न, उद्योगांमध्ये स्थानिकांचे शोषण, अतिवृष्टी व त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सारख्या विषयांवर आपले विचार मांडले.
राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या भाजप युतीच्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात अनुदान दिल्या गेलेले नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना शासन स्तरावर धुळखात पडले आहे तर शासनाने अनेक लोक कल्याणकारी विकासाच्या कामाला स्थगिती देऊन अडचण निर्माण केली महागाईमुळे 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाने महागाईमुळे शेतकऱ्यांचे खिसे खाली करण्याचा सपाटा सुरू केला आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या युवकांनी अन्याय अत्याचाराविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ग्राम पातळीवर व शहरी भागामध्ये पक्ष संघटन चे काम वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. युवकांच्या कार्याचा आढावा घेत लोकांनी शासकीय योजना व पक्षाचे कार्य घरापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांच्या संपर्कात राहण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत शासनाच्या विविध बनवाबनवी कार्यक्रमाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
अध्यक्ष महबूब शेख यांनी अनेक विषयाला हात घालीत युवकांना मार्गदर्शन केले व संवाद साधून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन भटारकर, प्रदेश कार्य अध्यक्ष होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आबिद अली, राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रस्ताविक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली यांनी केले. यावेळी मंचावर शरद जोगी तालुकाध्यक्ष यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सदानंद गिरी यांनी केले. या प्रसंगी तालुक्यातील अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवयुवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.