Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमच्या सभापतीना खुर्ची द्या हो खुर्ची
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरोधी पक्ष भाजपा नगरसेवक डोहे यांची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - गडचांदूर नगर परिषद ची स्थापना सन 2014 झाली व ...
विरोधी पक्ष भाजपा नगरसेवक डोहे यांची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर नगर परिषद ची स्थापना सन 2014 झाली व दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक सन 2020 ला पार पडली आणि मोठ्या अपेक्षां ठेवून सौ. सविताताई टेकाम नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी कांग्रेसचे शरद जोगी उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले. गडचांदूर शहर हे 40 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले औद्योगिक शहर, या शहराचा सर्वांगीन विकास करतील, प्रशासना वर वचक ठेवतील असे वाटत होते, मात्र यात पूर्णपणे कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे असे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. 
"आपण भले अपनी  कुर्सी भली" म्हणणाऱ्या नगराध्यक्षाला पक्ष्याच्या सभापतींच्या खुर्चीचा विसर पडला आहे. नगराध्यक्ष तथा तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या शून्य नियोजना मुळे नगर परिषद आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. सफाई कामगार यांचे 14 महिन्याचे वेतन देऊ शकत नाही, हे तर जगजाहीरच आहे. परन्तु सत्तेत असलेल्या आपल्याच सभापतीच्या खुर्ची व टेबल हटविले ही किती "शोकांतिका" म्हणावे. 
जरी सभापती महोदयाना याची जरी गरज नसेल तरी विरोधी नगरसेवकांना तसेच जनतेला आपले गाऱ्हाणे मांडण्या करीता, समस्यां सोडविण्याकरीता त्यांचे खुर्ची जवळ यावे लागते हे नाकारता येत नाही. त्यांना बसण्याकरीता व्यवस्था झाल्यास ते सन्मानपूर्वक नगर परिषद कार्यालयात वेळ देऊन जनतेच्या समस्या सोडविल या हेतूने विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली असून आतातरी सभापतींना स्वतन्त्र खुर्ची देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top